श्री गुरुचरित्र अध्याय १ चे श्र्लोक ( मराठी माहिती )
श्री गुरुचरित्र अध्याय १ चे श्र्लोक ( मराठी माहिती ) ।। श्री गणेशाय नमः ।। श्रीसरस्वत्यै नमः । श्रीकुलदेवतायै नमः । श्रीपादश्रीवल्लभाय नमः । श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः । ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥१॥ हालविशी कर्णयुगुले । तेथूनि जो का वारा उसळे । त्याचेनि वाते विघ्न पळे । विघ्नांतक म्हणती तुज ॥२॥ Marathi गुइलेन-बॅरे सिंड्रोम, गूढ आजाराने पश्चिम बंगालमध्ये किशोरचा मृत्यू Read more recommended by CLEAR EYE VISION नेत्र रोग विशेषज्ञ हैरान हैं! 5 दिनों में 100% तक आँखो की रौशनी और जानें तुझे शोभे आनन । जैसे तप्त कांचन । किंवा उदित प्रभारमण । तैसे तेज फाकतसे ॥३॥ विघ्नकाननच्छेदनासी । हाती फरश धरिलासी । नागबंद कटीसी । उरग यज्ञोपवीत ॥४॥ चतुर्भुज दिससी निका । विशालाक्षा विनायका । प्रतिपाळिसी विश्वलोका । निर्विघ्ने करूनिया ॥५॥ तुझे चिंतन जे करिती । तया विघ्ने न बाधती । सकळाभीष्टे साधती । अविलंबेसी ॥६॥ सकळ मंगल कार्यासी । प्रथम वंदिजे तुम्हासी । चतुर्द...