श्री गुरुचरित्र अध्याय २३चे श्र्लोक ( मराठी माहिती )
श्री गुरुचरित्र अध्याय २३चे श्र्लोक ( मराठी माहिती ) ॥ श्रीगणेशाय नमः ॥ विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगीयाते पुसत । पुढील कथा विस्तारत । निरोपावी दातारा ॥१॥ सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरूची अगम्य लीला । तोचि विप्रे प्रकट केला । जेणे वांझ महिषी दुभिली ॥२॥ तया ग्रामी येरे दिवसी । क्षारमृत्तिका वहावयासी । मागो आले तया महिषीसी । द्रव्य देऊ म्हणताती ॥३॥ recommended by Bitcoin Bank Do This For 15 Minutes A Day And Earn ₹84,000 Daily Learn more विप्र म्हणे तयासी । नेदू दुभते महिषीसी । दावीतसे सकळिकांसी । क्षीरभरणे दोनी केली ॥४॥ करिती विस्मय सकळ जन । म्हणती वांझ दंतही । काल होती नाकी खूण । वेसणरज्जू अभिनव ॥५॥ नव्हती गर्भिणी वांझ महिषी । वत्स न होता दुभे कैसी । वार्ता फाकली विस्तारेसी । कळली तया ग्रामाधिपतीस ॥६॥ विस्मय करुनी तये वेळी । आला अधिपती तयाजवळी । नमोनिया चरणकमळी । पुसतसे वृत्तान्त ॥७॥ विप्र म्हणे तयासी । असे संगमी संन्यासी । त्याची महिमा आहे ऐसी । होईल ईश्वर अवतार ॥८॥ नित्य आमुच्या मंदिरासी । येती श्रीगुरु भिक...