Posts

Showing posts with the label श्री गुरुचरित्र अध्याय ११ चे श्र्लोक ( एम पी एस सी मराठी माहिती )

श्री गुरुचरित्र अध्याय ११ चे श्र्लोक ( मराठी माहिती )

Image
                श्री गुरुचरित्र अध्याय ११ चे श्र्लोक ( मराठी माहिती )  श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें अवतार जाहले कैसी । विस्तारोनियां आम्हांसी । सांगा स्वामी कृपामूर्ति ॥१॥ सिद्ध म्हणे ऐक वत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा । पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्‍त्रियेची ॥२॥ शनिप्रदोषीं सर्वेश्वरासी । पूजित होती गुरु-उपदेशीं । देहवासना असतां तियेसी । पंचत्व पावली तयेवेळीं ॥३॥ झाला जन्म पुढें तिसी । कारंज-नगर उत्तरदेशीं । वाजसनीय शाखेसी । विप्रकुळीं जन्मली ॥४॥ जातक वर्तलें तियेसी । नाम ‘अंबा-भवानी’ ऐसी । आरोपिलें स्नेहेसीं । मातापितरीं परियेसा ॥५॥ वर्धतां मातापित्यागृहीं । वाढली कन्या अतिस्नेही । विवाह करिती महोत्साहीं । देती विप्रासी तेचि ग्रामीं ॥६॥ शिवव्रती असे तो ब्राह्मण । नाम तया ‘माधव’ जाण । त्यासी दिधली कन्या दान । अतिप्रीतींकरुनि ॥७॥ तया माधवविप्राघरीं । शुभाचारें होती नारी । वासना तिची पूर्वापरीं । ईश्वरपूजा करीतसे ॥८॥ पूजा करी ईश्वरासी । दंपती उभयवर्ग मनोमानसीं । प्रदोष...