श्री गुरुचरित्र अध्याय २०चे श्र्लोक ( मराठी माहिती )
श्री गुरुचरित्र अध्याय २०चे श्र्लोक ( मराठी माहिती ) ॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्री गुरुभ्यो नम: ॥ नामधारक शिष्यराणा । लागे सिध्दचिया चरणा । विनवीतसे कर जोडून । भक्तिभावेंकरूनि ॥१॥ पुसतसे तयावेळी । माथा ठेवोनि चरणकमळी । जय जया सिध्द-स्तोममौळी । विनंति एक अवधारा ॥२॥ स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी । Marathi पुण्यानंतर आता मुंबईत GBS चा पहिला रुग्ण आढळला,64 वर्षीय महिला रुग्णालयात दाखल Read more recommended by BRAINBERRIES The Fascinating Journey Of The Girl Who Wanted To Become A Horse LEARN MORE गौप्यरूपें अमरापुरासी । औदुंबरी असती म्हणतां ॥३॥ वर देऊनि योगिनींसी । आपण आले प्रकटेसी । पुढे तया स्थानी कैसी । विस्तार झाला तें निरोपावें ॥४॥ वृक्ष सांगसी औदुंबर । निश्चयें म्हणसी कल्पतरु । पुढे कवणा झाला वरु । निरोपावे दातारा॥५॥ शिष्यवचन ऐकोनि । संतोषला सिध्दमुनि । सांगतसे विस्तारुनि । औदुंबरास्थानमहिमा ॥६॥ सिध्द म्हणे ऐक बाळा । किती सांगूं गुरुची लीळा । औदुं...