श्री गुरुचरित्र अध्याय १३ चे श्र्लोक ( मराठी माहिती )
श्री गुरुचरित्र अध्याय १३ चे श्र्लोक ( मराठी माहिती ) ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणां । करसंपुट जोडूनि जाणा । विनवीतसे परियेसा ॥१॥ जय जया सिद्ध मुनी । तूं तारक या भवार्णी । सांगितलें ज्ञान प्रकाशोनि । स्थिर जाहलें मन माझें ॥२॥ गुरुचरित्रकथामृत । सेवितां तृष्णा अधिक होत । Marathi गुजरातमध्ये भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू Read more recommended by BRAINBERRIES Meet The Horsegirl: Surprising Secrets About Ayla Kristine! LEARN MORE शमन करणार समर्थ । तूंचि एक कृपानिधि ॥३॥ गुरुचरित्र कामधेनु । सांगितलें तुम्हीं विस्तारोनु । तृप्त नव्हे माझें मनु । आणखी अपेक्षा होतसे ॥४॥ क्षुधेंकरुनि पीडिलें ढोर । जैसें पावे तृणबिढार । त्यातें होय मनोहर । नवचे तेथोनि परतोनि ॥५॥ एखादा न देखे तक्र स्वप्नीं त्यासी मिळे क्षीरबरणी । नोहे मन त्याचे धणी । केवीं सोडी तो ठाव ॥६॥ तैसा आपण स्वल्पज्ञानी नेणत होतों गुर...