Posts

Showing posts with the label श्री गुरुचरित्र अध्याय १० चे श्र्लोक ( एम पी एस सी मराठी माहिती )

श्री गुरुचरित्र अध्याय १० चे श्र्लोक ( मराठी माहिती )

Image
              श्री गुरुचरित्र अध्याय १० चे श्र्लोक ( मराठी माहिती )  ॥ श्री गणेशाय नमः ॥   ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक विनवी जाण । कुरवपुरीचे महिमान । केवी जाहले परियेसा ॥१॥   म्हणती श्रीपाद नाही गेले । आणि म्हणती अवतार झाले । विस्तार करोनिया सगळे । निरोपावे म्हणतसे ॥२॥   सिद्ध सांगे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी । अनंतरूपे होती परियेसी । विश्वव्यापक परमात्मा ॥३॥ Marathi LIVE: मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांचा अर्थसंकल्प - देवेंद्र फडणवीस Read more   पुढे कार्यकारणासी । अवतार झाले परियेसी । राहिले आपण गुप्तवेषी । तया कुरवक्षेत्रांत ॥४॥   पाहे पा भार्गवराम देखा । अद्यापवरी भूमिका । अवतार जाहले अनेका । त्याचेच एकी अनेक ॥५॥   सर्वा ठायी वास आपण । मूर्ति एक नारायण । त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिति आणि प्रलय ॥६॥   भक्तजना तारावयासी । अवतरतो ह्रषीकेशी । शाप देत दुर्वासऋषि । कारण असे तयांचे ॥७॥   त्रयमूर्तीचा अवतार । याचा कवणा न कळे पार । निधान तीर्थ कुरवपूर । वसे तेथे गुरुमूर्ति ॥८॥   जे जे चिंतावे भक...