Posts

Showing posts with the label श्री गुरुचरित्र अध्याय २7 चे श्र्लोक (एम पी एस सी मराठी माहिती )

श्री गुरुचरित्र अध्याय २7 चे श्र्लोक ( मराठी माहिती )

Image
             श्री गुरुचरित्र अध्याय २7 चे श्र्लोक ( मराठी माहिती )  श्रीगणेशाय नमः । नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा विनवीतसे वचना । ऐका श्रोते एकचित्ते ॥१॥   जयजयाजी सिद्ध योगी । तू तारक आम्हा जगी । ज्ञानप्रकाश करणेलागी । दिले दर्शन चरणांचे ॥२॥   चतुर्वेद विस्तारेसी । श्रीगुरु निरोपिती विप्रांसी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावी दातारा ॥३॥ recommended by Bitcoin Bank Do This 15 Minutes A Day And Earn ₹17250 Per Hour. Check It Out Find out more Learn more   शिष्यवचन ऐकोनि । सांगता झाला विस्तारोनि । ऐक शिष्या नामकरणी । अनुपम महिमा श्रीगुरूची ॥४॥   किती प्रकारे विप्रांसी । श्रीगुरु सांगती हितासी । न ऐकती द्विज तामसी । म्हणती वाद का पत्र देणे ॥५॥   ऐसे उत्तर ऐकोनि कानी । कोप करिती श्रीगुरु मनि । जैसे तुमचे अंतःकरणी । तैसे सिद्धी पाववू म्हणती ॥६॥   सर्पाचे पेटारियासी । कोरू जाता मूषक कैसी । जैसा पतंग दीपासी । करी आपुला आत्मघात ॥७॥   तैसे विप्र मदोन्मत्त । श्रीगुरु न ओळखत । बळे आपुले प्राण देत । दिवांधवत्‍ ...