श्री गुरुचरित्र अध्याय १7 चे श्र्लोक ( मराठी माहिती )
श्री गुरुचरित्र अध्याय १7 चे श्र्लोक ( मराठी माहिती ) ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ सिद्ध म्हणे नामकरणी । गुरुभक्तशिखामणि । तुझी भक्ति गुरुचरणीं । लीन जाहली निर्धारीं ॥१॥ पर्जन्य येतां पुढारां । जैसा येतो सूचना वारा । तैसें तुझें दैन्य-हरा । ऐकसी गुरुचरित्र कथनभेद ॥२॥ ऐसें चरित्र कामधेनु । सांगेन तुज विस्तारोन । Marathi नाशिकमध्ये इनोव्हा कारने एका लहान मुलाला चिरडले, पोटच्या गोळ्याला मृत पाहून आई पडली बेशुद्ध Read more एकचित्त करुनि मन । ऐक शिष्या नामधारका ॥३॥ कृष्णावेणीतटाकेसी । भुवनेश्वरी-पश्चिमेसीं । औदुंबर वृक्षेसीं । राहिले श्रीगुरु परियेसा ॥४॥ गौप्यरुप असती गुरु । ठाव असे अगोचरु । अनुष्ठान धुरंधरु । चातुर्मास येणेंपरी ॥५॥ सिद्धस्थान असे गहन । भुवनेश्वरीसंनिधान । विशेष श्रीगुरु राहिले म्हणोन । उत्कृष्ट जाहलें महिमान ॥६॥ ऐकोनि सिद्धाचें वचन । नामधारक करी नमन । परमात्मा ...