श्री गुरुचरित्र अध्याय १६ चे श्र्लोक ( मराठी माहिती )
श्री गुरुचरित्र अध्याय १6 चे श्र्लोक ( मराठी माहिती ) ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ विनवी शिष्य नामांकित । सिद्धासी असे पुसत । सांगा स्वामी वृत्तांत । गुरुचरित्र विस्तारुनि ॥१॥ शिष्य समस्त गेले यात्रेसी । राहिले कोण गुरुपाशीं । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें दातारा ॥२॥ ऐकोनि शिष्याची वाणी । संतोषी झाले सिद्ध मुनि । Marathi कोलकात्याच्या ऑर्केस्ट्रा डान्सरचा बिहारमध्ये संशयास्पद मृत्यू Read more recommended by BITCOIN BANK 22-Year-Old From Tells How She Became Rich Check it out LEARN MORE धन्य धन्य शिष्या शिरोमणि । गुरुभक्ता नामधारका ॥३॥ अविद्यामायासुषुप्तींत । निजलें होतें माझें चित्त । तुजकरितां जाहलें चेत । ज्ञानज्योति-उदय मज ॥४॥ तूंचि माझा प्राणसखा । ऐक शिष्या नामधारका । तुजकरितां जोडलों सुखा । गुरुचरित्र आठवलें ॥५॥ अज्ञानतिमिरउष्णांत । पीडोनि आलों कष्टत । सुधामृतसागरांत । तुवां मातें लोटिलें ॥६॥ तुवां केले उपकारासी । संत...