श्री गुरुचरित्र अध्याय २१चे श्र्लोक ( मराठी माहिती )
श्री गुरुचरित्र अध्याय २१चे श्र्लोक ( मराठी माहिती ) ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका । उपदेशी ज्ञान निका । तये प्रेतजननीसी ॥१॥ ब्रह्मचारी म्हणे नारीसी । मूढपणे दुःख करिसी । कोण वाचला धरणीसी । या संसारी सांग मज ॥२॥ उपजला कोण मेला कोण । उत्पत्ति झाली कोठोन । जळात उपजे जैसा फेण । बुदबुद राहे कोठे स्थिर ॥३॥ Marathi दौंड येथे आईने केली स्वत:च्या मुलांची हत्या, पतीवर कोयत्याने हल्ला केला Read more recommended by HONDA The New Elevate Signature Black Edition Enhance your journeys with the New Honda Elevate Signature Black Edition LEARN MORE जैसा देह पंचभूती । मिळोनि होय आकृति । वेगळी होता पंचभूती । अव्यक्त होय देह जाण ॥४॥ तया पंचभूतांचे गुण । मायापाशी वेष्टोन । भ्रांति लाविली मी देह म्हणोन । पुत्रमित्रकलत्रमिषे ॥५॥ सत्त्व रज तमोगुण । तया भूतांपासोन । वेगळाली केली लक्षण । होती ऐका एकचित्ते ॥६॥ देवत्व होय सत्त्वगुण । रजोगुण मनुष्य जाण । दैत्यांसी तमोगुण । गुणानुसारे कर्मे ...