श्री गुरुचरित्र अध्याय १२ चे श्र्लोक ( मराठी माहिती )
श्री गुरुचरित्र अध्याय १२ चे श्र्लोक ( मराठी माहिती ) ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीगुरू म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी । अनित्य शरीर तूं जाणसी । काय भरंवसा जीवित्वाचा ॥१॥ श्लोक ॥ अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः । नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः ॥२॥ टीका ॥ एखादा असेल स्थिरजीवी । त्यासी तुझी बुद्धि बरवी । Marathi मोदी सरकारचा प्रत्येक अर्थसंकल्प म्हणजे निवडणूक पॅकेज… संजय राऊत यांनी टोला लगावला Read more recommended by HERBEAUTY रेखा के फ़िल्मी सफर से जुड़ी ये बातें आपको जाननी चाहिए और जानें अनित्य देह विभवोभावीं । पुढें कवणा भरंवसा ॥३॥ देह म्हणिजे क्षणभंगुर । नाहीं राहिले कवण स्थिर । जंववरी दृढ असेल शरीर । पुण्यमार्गे रहाटावें ॥४॥ जो असेल मृत्यूसी जिंकीत । त्याणें निश्चयावें शरीर नित्य । त्यासि तुझा उपदेश सत्य । म्हणे करीन धर्म पुढें ॥५॥ अहोरात्रीं आयुष्य उणें । होत असतें क्षणक्षणें । करावा धर्म याचिकारणें । पूर्ववयेसीं परियेसा ॥६॥ ...