श्री गुरुचरित्र अध्याय २९ चे श्र्लोक ( मराठी माहिती )
श्री गुरुचरित्र अध्याय २९ चे श्र्लोक ( मराठी माहिती ) । श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । नामधारक विनवी सिद्धासी । मागे कथा निरोपिलीसी । भस्ममाहात्म्य श्रीगुरूसी । पुसिले त्रिविक्रमभारतीने ॥१॥ पुढे कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्री । निरोप द्यावा सविस्तारी । सिद्धमुनि कृपासिंधु ॥२॥ ऐसे विनवी शिष्य राणा । ऐकोनि सिद्ध प्रसन्नवदना । Marathi वांद्रे पश्चिम येथे एका 64 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला Read more recommended by BITCOIN BANK Do This For 15 Minutes A Day And Earn ₹84,000 Daily LEARN MORE सांगतसे विस्तारून । भस्ममाहात्म्य परियेसा ॥३॥ श्रीगुरु म्हणती त्रिविक्रमासी । भस्ममाहात्म्य मज पुससी । एकचित करूनि मानसी । सावधान ऐक पा ॥४॥ पूर्वापरी कृतयुगी । वामदेव म्हणिजे योगी । प्रसिद्ध गुरु तो जगी । वर्तत होता भूमीवरी ॥५॥ शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी । गृह-सारादि वर्जूनि । कामक्रोधादि त्यजूनि । हिंडत होता महीवरी ॥६॥ संतुष्ट निःस्पृह असे मौनी । भस्म सर्वा...