श्री गुरुचरित्र अध्याय ३ चे श्र्लोक ( मराठी माहिती )
श्री गुरुचरित्र अध्याय ३ चे श्र्लोक ( मराठी माहिती ) श्रीगणेशाय नमः ॥ येणेपरी सिद्ध मुनि । सांगता झाला विस्तारोनि । संतोषोनि नामकरणी । विनवितसे मागुती ॥१॥ जय जयाजी सिद्ध मुनी । तारक तू आम्हालागुनी । संदेह होता माझे मनी । आजि तुवा फेडिला ॥२॥ तुझेनि सर्वस्व लाधलो । आनंदजळी बुडालो । परम तत्त्व जोडलो । आजिचेनि दातारा ॥३॥ Marathi काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला, म्हणाले- संसदीय समित्या केवळ दिखावा बनल्या आहे Read more 00:49 recommended by CLEAR EYE VISION नेत्र रोग विशेषज्ञ हैरान हैं! 5 दिनों में 100% तक आँखो की रौशनी और जानें ऐसे श्रीगुरुमहिमान । मज निरोपिले त्वां ज्ञान । आनंदमय माझे मन । तुझेनि धर्मे स्वामिया ॥४॥ कवणे ठायी तुमचा वास । नित्य तुम्हा कोठे ग्रास । होईन तुझा आतां दास । म्हणोनि चरणी लागला ॥५॥ कृपानिधी सिद्ध मुनी । तया शिष्या आलिंगोनि । आशीर्वचन देऊनि । सांगे आपुला वृत्तान्त ॥६॥ जे जे स्थानी होते गुरु । तेथे असतो चमत्कारू । पुससी जरी आम्हां आहारू । गुरुस्मरणी नित्य जाणा ॥७॥ श्रीगुरुचरित्र महिमान । तेचि आम्...